काठमांडू : पश्चिम नेपाळमधील कास्की जिल्ह्यात मंगळवारी ४.७ तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप देखरेख आणि संशोधन केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र काठमांडूपासून सुमारे २५० किमी अंतरावर असलेल्या कास्की जिल्ह्यातील सिनुवा भागात होते. दुपारी १ वाजून ५९ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के बसले. तनाहू, पर्वत आणि बागलुंग या शेजारच्या जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. यापूर्वी १४ मे रोजी पूर्व नेपाळमधील सोलुकुम्बू जिल्ह्यातील छेस्कम भागात ४.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता.
Fans
Followers